मुंबई: कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टातील काल झालेल्या सुनावणीचे पडसाद महाराष्ट्राच्या विधान परिषदेत राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले ,नारायण राणे आणि धनंजय मुंढे यांनी मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला धारेवर धरले .
राष्ट्रवादीचे आमदार हेमंत टकले यांनी सुरुवातीला बेळगाव प्रश्न उपस्थित केल्या नंतर राष्ट्रवादीचे गट नेते धनंजय मुंडे यांनी बेळगाव केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र विरोधी भूमिका घेतंय आणि महाराष्ट्राचे ४८ खासदार गप्प का आहे राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे भाजपचे सरकार असतेवेळी अनास्थेची भावना का असा प्रश्न उपस्थित केला या नंतर कॉंग्रेस आमदार नारायण राणे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. बेळगाव प्रश्नी सुप्रीम कोर्टात इतक्या मोठ्या घटना घडतात मात्र महाराष्ट्र सरकार कडे यावर चर्चा करायला वेळ नाही हे दुर्दैवी आहे अशी टीका करत या विषयावर वेगळी चर्चा करा अशी मागणी त्यांनी सभा पतीकडे केली .
विधान परिषदेत विशेष चर्चा
यावर उत्तर देंताना समन्वयक मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुप्रीम कोर्टात या प्रश्नावर जेष्ठ विधीतज्ञ हरीश साळवे यांच्याशी आमची चर्चा केली आहे ते कोर्टात उपस्थित राहणार आहेत राज्य सरकार च याकडे बारकाई ने लक्ष आहे.या खटल्यात महाराष्ट्राची बाजू सक्षम आहे अस म्हणत या विषयी चर्चा करण्यासाठी उद्या विशेष वेळ दिला जाईल असा आश्वासन दिले.