महाराष्ट्राचे चार पंच प्रो लीग कबड्डीमध्ये

0

मुंबई। यंदाच्या मोसमातील प्रो लीग कबड्डी स्पर्धेतील सामन्यांना 28 जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी लीगमधील संघाची जोरात तयारी सुरू आहे.

खेळाडूंसोबत सामनाअधिकारीही स्पर्धेसाठी सज्ज होत आहेत. तब्बल महिनाभर रंगणार्‍या या लीगसाठी महाराष्ट्रीतील चौघा कबड्डीपंचाची अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. रायगडमधील सुहास पाटील, मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या शुभांगी पाटील आणि जितेश शिरवाडकर आणि मुंबई उपनगर संघटनेच्या आरती बारी या लीगमध्ये सामना अधिकार्‍याची जबाबदारी सांभाळतील.