मुंबई: भारतातील कोरोनाच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. भारतातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची संख्या आता दोन हजारापार गेली आहे. मागील 12 तासात 82 रुग्ण नव्याने आढळले असल्याने महाराष्ट्रातील कोरोना बधितांचा आकडा 2065 झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि एमएमआरडी रिजन मधील आहे. त्यापाठोपाठ पुण्यातील रुग्ण संख्या आहे.