शरद पवारांकडून ही अपेक्षा नव्हती; मोदींकडून पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा समाचार

0

महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय ‘फिर एक बार फडणवीस सरकार’: मोदी

नाशिक: शरद पवार हे देशातील अनुभवी नेते आहेत. मात्र सध्याच्या राजकीय समीकरणामुळे ते सैरभैर झाले आहे. आता शरद पवारांच्या तोंडून देशविरोधी विधान येऊ लागले आहे. शरद पवार हे मतदानासाठी आता पाकिस्तानचे गोडवे गायला लागले आहे. संपूर्ण जगाला माहित आहे, पाकिस्तान हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. परंतु शरद पवार पाकिस्तानचे गोडवे गातात. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असा टोला मोदींनी शरद पवारांना लगावला. शरद पवारांकडून मला ही अपेक्षा नव्हती असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यात भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांची महाजानादेश यात्रा निघाली होती. या यात्रेचा आज नाशिकमध्ये समारोप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाजानादेश यात्रेची समारोप सभा सुरु आहे. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजपची सरकार आणून फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येणार यात शंका नसल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री असणारे फडणवीस दुसरे यशस्वी मुख्यमंत्री ठरले आहे असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांचा ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
मुख्यमंत्री फडणवीस यांचा ऊर्जावान मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान मोदींनी उल्लेख केला. स्थिर राजकारणाची परंपरा कायम टिकून राहावे यासाठी जनतेने पुन्हा राज्यात फडणवीस यांना संधी द्यावी अशी विनंती देखील त्यांनी केली.

मागील पाच वर्षात भाजप सरकारने सैन्यांचे मनोधैर्य वाढविले आहे. आमच्या सरकारने बुलेट प्रुफ जॅकेट देऊन सैनिकांचे संरक्षण केले. कॉंग्रेस सरकारने सैनिकांना बुलेट प्रुफ जॅकेट देण्याचा विचार कधीही केला नव्हता असा आरोप देखील मोदींनी केला.