महाराष्ट्राच्या मातीने स्वदेशीचा संस्कार दिला: अमित शहा

0

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या रुग्णालयाचे उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्राची भूमी ही प्रेरणादायी भूमी आहे. महाराष्ट्राच्या मातीने स्वदेशीचा संस्कार दिला असे अमित शहा यांनी सांगितले. शिवाजी महाराजांनी देशाला स्वराज्य दिले असेही अमित शहांनी सांगितले.

नारायण राणे अन्यायाविरोधात लढणारे नेते, त्यांनी अन्यायाविरोधात कायम लढा दिला असे गौरवोद्गारही अमित शहा यांनी काढला. नारायण राणे यांच्यावर अन्याय होणार नाही काळजी घेतली जाईल असे सांगून त्यांनी राणे यांच्या पुनर्वसनाचे संकेतही दिले.