महाराष्ट्राच्या वेदिका अमिनचा ब्रेस्टस्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम

0

पुणे । महाराष्ट्राच्या वेदिका अमिनने 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेतील प्राथमिक फेरीतच नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. वेदिकाने मुलींच्या तीसर्‍या गटात 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धेत 1मिनीट 18.63 सेकंदाचा विक्रम नोंदवला.

मिडलेमध्ये संजीथी सहाला सुवर्णपदक
या गटात दुसरे स्थानही महाराष्ट्राच्या जलतरणपटूने पटकावले. अपेक्शाने 1 मिनीट 22.76 सेकंदात ही शर्यत पूर्ण करुन दुसरा क्रमांक मिळवला. आस्था बारडोलोई 1 मिनीट 24.50 सेकंद अशा कामगिरीसह तिसर्‍या स्थानावर राहिली. या गटातील 200 मीटर मिडले प्रकारात महाराष्ट्राच्या संजीथी सहाने बाजी मारली. संजीथाने अव्वल स्थान मिळवताना 2 मिनीटे 38.18 सेकंद अशी वेळ नोंदवली.