महाराष्ट्रातील पत्रकारांच्या लेखणीत संवेदना, तळमळ कायम : संजय राऊत

0

चंद्रपूर । महाराष्ट्रातील पत्रकारांच्या लेखणीत अजूनदेखील संवेदना आणि तळमळ कायम आहे, म्हणूनच मराठी पत्रकारितेचा झेंडा देशभर टीकून देशाचे नेतृत्व करत आहे, असे ठाम मत दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चंद्रपूर येथील एका कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.

देशाच्या, राज्याच्या विकासात वृत्तपत्राचे योगदान महत्त्वाचे आहे, ग्रामीण पत्रकार तर देशाचे आधारस्तंभच आहेत. पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने ग्रामीण पत्रकारांनी केले, असे प्रतिपादन दैनिक सामनाचे संपादक तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केले़ चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित कर्मवीर सन्मान व विविध स्पर्धा पुरस्कारांचे वितरण रविवारी स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील पत्रकार आणि पत्रकारितेवर भाष्य केलं. देशाच्या, राज्याच्या विकासात वृत्तपत्राचे योगदान महत्त्वाचे आहे, ग्रामीण पत्रकार तर देशाचे आधारस्तंभच आहेत. पत्रकारिता जिवंत ठेवण्याचे काम खऱ्या अर्थाने ग्रामीण पत्रकारांनी केले, असं संजय राऊत म्हणाले.

या कार्यक्रमावेळी राज्याचे अर्थ, नियोजन, वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार बाळू धानोरकर, ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, महाराष्ट्र राज्य श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुनील देशपांडे उपस्थित होते.