नवी दिल्ली : कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना मंगळवारी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. केंद्राने पूरग्रस्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी जवळपास ७०० कोटी मंजूर केले असल्याची माहिती दिली केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली. राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांनी पातळी ओलांडल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका हा राज्यातील शेतीलाही बसला आहे. पुराचे शेतात घुसल्याने प्रवाहाच्या वेगात ही पिकेही वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी पाणी साचून राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता
राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सुमारे 8 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे असा प्राथमिक अंदाज राज्य सरकारने नुकताच वर्तवला आहे. यात कोकणातील रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेले पूल बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत यांचा यात समावेश आहे. मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत अधिक माहिती देताना म्हटले की, अतिवृष्टीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांचे नुकसान झाले आहे. घरांची, मालमत्तेचे मोठं नुकसान झालं आहे. वारंवार घडणार्या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरूपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरू आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे २०० जणांचा मृत्यू
राज्यात २२ ते २४ जुलैदरम्यान कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीतील बळींची संख्या आता २०० वर पोहोचली असून अजूनही २५ लोकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त के ली जात आहे. पुराचा राज्यातील १०२८ गावांना फटका बसला असून दोन लाख लोक बाधित झाले आहेत तर २९ हजार पशुधनाचे नुकसान झाले आहे. पूरग्रस्त तसेच स्थलांतरित लोकांच्या मदतीसाठी २५९ ठिकाणी मदत के ंद्रे सुरू करण्यात आली असून सात हजार ८३२ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.