आझमगड: आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याची दखल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेले असता त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हत्या झालेल्या दलित सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत चालले होते. पण नितीन राऊत यांना पोलिसांनी आझमगड सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.
बसगाव जिल्हा आज़मगढ़ उत्तरप्रदेश में मेरे भाई दलित प्रधान सत्यमेव दस्ते की हत्या हुई। पीड़ित परिवार को मिलने से मुझे रोका जा रहा है। pic.twitter.com/SOTzgv4Z24
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) August 20, 2020
युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकले नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे असे काँग्रेसने म्हटले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली. पोलिसांनी रोखल्यााने नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर बसून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला. नितीन राऊत यांच्यावरील पोलीस कारवाईमुळे राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
आज़मगढ़ से पहले गौरा-बादशाहपुर में दलित कांग्रेस अध्यक्ष एवं महाराष्ट्र सरकार मंत्री @NitinRaut_INC जी, भगवती चौधरी और कांग्रेस के कार्यकर्ताओं के साथ हमे रोक लिया गया है ,
डॉ नितिन राउत जी इस तानाशाही के खिलाफ यहीं धरने पे बैठ गए हैं। pic.twitter.com/mnPMu6s1fY— Pradeep Narwal (@Narwal_inc) August 20, 2020