लातूर । राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा प्रण राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना केला होता. त्यानुसार शहरी भागातले भारनियमन कमी झालेही. पण हे करता यावे, यासाठी 33 लाख शेतकर्यांच्या नावे वाढीव बिले पाठवण्यात आल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना आजवर 6 हजार कोटींचा फटका बसला आहे. हे सगळे प्रकरण पाहून शेतकरी पुत्रांनी शेतकर्यांनाच कसे तोशीस पाडले याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
गळा कापण्याचा निर्णय
पाणीपुरवठा आणि दिवाबत्तीचा लोड वाढवून भागेना, तेव्हा महावितरणच्या अधिकार्यांनी शेतकर्यांचा गळा कापण्याचा निर्णय घेतला. 3 एचपीचे शेतीपंप वापरणार्या 2 लाख 54 हजार 637 शेतकर्यांना 5 एचपीची वाढीव बिले देण्यात आली. 5 एचपीवाल्या 1 लाख 38 हजार 473 शेतकर्यांना 7.5 एचपीचीआणि 7.5 एचपी पंपवाल्या 12 हजार 604 शेतकर्यांना 10 एचपीची वाढीव बिले देण्यात आली.
भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प
दिवाकर उरणे लातूरच्या परिमंडळ कार्यालयात वाणिज्य शाखेचे ज्युनिअर मॅनेजर होते. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यासाठी बैठका सुरु झाल्या. किमान शहरी भागात लोडशेडिंग कमी करण्याचे ठरले. त्यासाठी महावितरणचा तोटा कमी आहे, हे एमईआरसीला दाखवावे लागणार होते.
धक्कादायक खुलासाही समोर
महाराष्ट्रात एकूण 4 लाख 5 हजार 724 शेतकर्यांची बिले वाढवण्यात आली. वाढीव बिलांमुळे शेतकर्यांच्या नावांवर प्रत्येक तीन महिन्याला 80 कोटींचा बोजा चढत गेला. खोटी बिले दिल्याची माहिती अधिकारात मान्यमहावितरण खात्यातून रिटायर झाल्यावर दिवाकर उरणेंनी आत्मसन्मानासाठी लढाच उभारला. महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयावर माहितीच्या अधिकाराचा पाऊस पाडला आणि धक्कादायक खुलासे होऊ लागले. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना खोटी बिले दिली गेल्याचे माहिती अधिकारात मान्य केले.