महाराष्ट्रातील 43 हजार गावांना स्वच्छ पाणी देणार

0

भुसावळात अटल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील

भुसावळ : महाराष्ट्रातील 43 हजार गावांना स्वच्छ पाणी देण्याचा शासनाचा प्रयत्न असून कुणीही घराविना रहायला नको म्हणून प्रत्येक गोरगरीबाला घरे देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अटल योजनेच्या उद्घाटनप्रसंगी दिली. सॉफ्टवेअरमधील अडचणीमुळे कर्जमाफीला विलंब झाला मात्र पाच महिन्यात 33 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्यात आली असून काँग्रेसने मात्र 18 महिने त्यासाठी लावल्याची टीका करीत काँग्रेसने केवळ घोषणाबाजीच केल्याची टिका त्यांनी केली. पालिकेने स्वतःचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्वयंचलित सौर उर्जा प्रकल्पासह घनकचर्‍यावरून वीज निर्मिती करावी, असा सल्ला त्यांनी दिला. अटल योजना प्रत्यक्षात साकार होण्यासाठी परीश्रम घेणार्‍या आमदार संजय सावकारे यांचे त्यांनी कौतुक केले.