महाराष्ट्रातून ५ लाख क्युसेक पाणी कर्नाटकात सोडण्यास परवानगी

0

मुंबई: महाराष्ट्रात सध्या भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पाणी कर्नाटकात सोडण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे.

महाराष्ट्रातून ५ लाख क्युसेक पाणी कर्नाटकातील अलमट्टी धरणात सोडले जाणार आहे. त्यामुळे सांगलीतील पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. सांगलीतील पूरस्थिती सध्या गंभीर आहे. अनेक कुटुंबीय स्थलांतरीत झाले आहेत.