महाराष्ट्रात आज तब्बल 113 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह: आकडा साडेसातशेच्या जवळ

0

मुंबई: कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात आहे. आज रविवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी तब्बल 113 रुग्ण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे आज कोरोनाचा आकडा महाराष्ट्रात 748 झाला आहे. संपूर्ण देशात हा आकडा 3577 वर पोहोचला आहे.

दररोज रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने चिंतेची बाब आहे. सरकारने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली, मात्र रुग्ण संख्येत वाढ होतच असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.