महाराष्ट्रात आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि राहू-शिवसेना

0

मुंबई-भाजप-शिवसेनेची युती होणार की नाही याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान आज याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना खासदारांची बैठक होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात शिवसेना हाच मोठा भाऊ असून पुढेही राहणार असल्याचे सांगत भाजपकडून युतीबाबत आम्हाला कोणतेही प्रस्ताव आलेले नाही असे सांगितले.

देशात अनेक अदृश्य हात आहेत ते राजकारण करत आहे असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला.