मुंबई: संपूर्ण जगात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. संख्या झपाट्याने वाढत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची संख्या आता १०० च्या जवळ पोहोचली आहे. आत्ताच्या घडीला महाराष्ट्रातील कोरोनाची संख्या ९७ वर पोहोचली आहे. आज तब्बल ८ रुग्ण नव्याने आढळले आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. मुंबईतील कोरोनाची संख्या ३८ वर पोहोचली आहे.
काल कोरोनाच्या रुग्ण संख्येत १५ ने वाढ होऊन ८९ वर पोहोचले होते. मात्र आता यात वाढ झाली असून आता ९७ वर रुग्ण संख्या पोहोचले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब आहे.