मुंबई: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा आकडा वाढतच चालला आहे. भारतात हा आकडा ६०० पर्यंत पोहोचल आहे. देशात महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाची संख्या आता ११६ वर पोहोचली आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याची माहिती दिली. आज बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन पाच रुग्ण आढळले आहे. सांगलीतील इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील पाच तर मुंबईत चार नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे ही संख्या ११६ वर पोहोचली आहे. १७ दिवसापूर्वी महाराष्ट्रात ९ रुग्ण होते, आता ११६ झाले आहेत. त्यामुळे काळजी घेण्याची आवश्यकता आहे.