महाराष्ट्रात भाजपमुळे ओबीसींची वाईट अवस्था

0

जळगाव । महाराष्ट्रात ओबीसी समाजाची वाईट अवस्था आहे. भाजपची सत्ता ओबीसींमुळे राज्यात आली राम मंदिराचा मुद्दा पुढे करून येत्या निवडणुकीमध्ये दिशाभूल करण्याचे कारस्थान भाजपचे नेते रचत असल्याचा गंभीर आरोप कॉग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष कल्याण दळे यांनी जळगावात केला. कॉग्रेस भवनात आयोजित त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये शहर अध्यक्ष भागवत भंगाळे, बारा मुलुतेदार संघटनेचे ईश्वर सूर्यवंशी, चंद्रकांत सोनवणे, नाना शिरसाठ, कफिल अहेमद शेख, शांताराम खोडे, अशोक कुमावत, शाम तायडे, दीपक सोनवणे, घोडेस्वार, अलका सोनवणे, बिबाबाई सूर्यवंशी, छायाताई घोरडे, संगीत गवळी, विष्णू भोळे उपस्थित होते.

जानकर , महात्मेनी राजीनामे द्यावेत
धनगर समाजाला आतापयर्ंत आरक्षण देण्यात आले नाही. याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे, सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यात येणार असल्याचे दळे यांनी सांगितले . राज्याचे मंत्री महादेव जाणकर , खासदार महात्मे यांनी समाजाच्या मागण्या मान्य होत नसतील तर राजीनामा द्यावा ओबीसी पुन्हा कॉग्रेससोबत येतील असा विश्वास असल्याचे कल्याण डोळे यांनी सांगितलेे. ओबीसींचा फक्त वापर होत असून त्यांची जनगणना झाली पाहिजे. भाजपने लोकांना आश्वासने दिली मात्र ती आता हवेत विरली आहेत. अच्छे दिन आयेंगे, मेक इन इंडिया या सर्व बोलाच्याच गप्पा आहेत. भाजप आश्वासने देते मात्र पूर्ण करीत नाही. लोकांना फसविण्याचे काम सध्या सुरु असल्याचेही ते म्हणालेे.

हिंदूराष्ट्र नाहीतर कोणते राष्ट्र?
अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण मिळाले पाहिजे , त्यांना न्याय मिळायला पाहिजे, विशेष निधीची तरतूद करावी ही प्रमुख मागणी आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर हिंदूराष्ट्र बनवण्याचे स्वप्न दाखविले जाते. आपण ज्या देशात राहतो तो हिंदुस्थानच असून भाजपवाल्यांनी इंडिया पुढे करत भारताला मागे टाकले टाकले असल्याचा समाचार त्यांनी घेतला. मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचे स्मारक बनविण्यात येत आहे. बारा बलुतेदारांनी स्वराज्यासाठी कष्ट घेतले आह, असेही ते म्हणाले. विविध योजनांचे आमिष दाखविण्यात येत असून मुद्रा लोन योजनेत कर्ज देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप दळे यांनी केला