महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार नाही!

0

मुंबई । महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली ताकद सिध्द केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री कायम राहणार हे आता स्पष्ट झाले आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिर
मनोहर पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देऊन, गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पर्रीकर हे विराजमान झाल्याने केंद्रात फेरबदल होतील अशा चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लावण्यात येणार आहे, तसेच मुख्यमंत्री यांची केंद्रात वर्णी लागून त्यांच्या जागी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची वर्णी लागू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून रंगली होती. मात्र गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत बोलवण्याचा कुठलाही विचार नसल्याचे स्पष्ट केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थिर आहे. मुख्यमत्रयाच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी यश मिळवले आहे अशी कौतूकांची थापही गडकरी यांनी मुख्यमंत्रयाच्या पाठीवर दिली.

दुफळीमुळे गोव्यात काँग्रेसने संधी गमावली
गोव्यात भाजपने बहुमत सिध्द केले असून स्थिर आणि विकासभिमुख सरकार स्थापन झाले आहे. मनोहर पर्रीकर यांचे सरकार पाच वर्षे यशस्वीपणे पूर्ण करतील असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. काँग्रेसमधील दुफळीमुळे त्यांनी संधी गमावल्याचेही गडकरी म्हणाले. गोव्यातील निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी दाखवलेली इच्छा आणि गडकरीवर टाकलेली जबाबदारी ते सरकार स्थापन होई पर्यंतच्या घडामोडींचा रिपोर्ट गडकरी यांनी पत्रकारांसमोर मांडला. मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री होत असतील आणि केंद्राचा पाठींबा मिळत असेल तरच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठींबा देण्यात येईल असे गोवा फॉरर्वड आणि मजीपी यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळेच पर्रीकर हे मुख्यमंत्री झाले आहेत. संरक्षणमंत्रीपद सोडून पर्रीकर हे मुख्यमंत्रीपद का झाले याचा असा उलगडा त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बहुमत सिध्द करण्यास सांगितले होते. 23 लोकांच समर्थन मिळाले आहे. त्यामुळे भाजपने बहुमत सिध्द केले आहे. काँग्रेसकडून आरोप केला जातोय मात्र हे आरोप निराधार असल्याचेही गडकरी म्हणाले.

कर्जमाफीवर गकरींचे मौन
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना गडकरी यांनी काहीही उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील हे त्यावर निर्णय घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.