नवी दिल्ली: आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. यात पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील विषय गाजले. महाराष्ट्रात परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मदतीची मागणी यावेळी महाराष्ट्रातील खासदारांनी केली. दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने पूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी लोकसभेत केली.
तसेच राज्यपालांनी जी मदत जाहीर केली आहे, ती तोकडी असून वाढीव मदत द्यावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली आहे. शिवसेनेने देखील पहिल्याच दिवशी मदतीची मागणी केली आहे.