महाराष्ट्रामुळे दिल्लीकर चिंतीत !

0

नवी दिल्ली:राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा चिंतेत भर टाकत आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात होत असलेला कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवले जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले आहे.