महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न; स्वस्त पेट्रोलचे फलक

0

मुंबई । सध्या देशात पेट्रोल दरांवरुन गोंधळ सुरु आहे. विरोधकांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पेट्रोल दरावरुन नेटीझन्सकडूनही मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यातच कर्नाटककडून महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील अनेक पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रापेक्षा कमी दरात पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध अशा आशयाचे फलक लावण्यात येत आहेत.

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील निप्पाणी जवळच्या एका पेट्रोलपंप चालकाने अशाप्रकारचे फलक लावले आहेत सोशल मीडियातूनही चांगलीच चर्चा रंगत आहे. सध्या देशात पेट्रोल दरावरुन वातावरण तापलेलं असताना, दुसरीकडे राज्य सरकारने इंधनावर 11 रुपये अतिरिक्त कर लावला. त्यामुळे राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर अजून वाढले आहेत. पण कर्नाटक सीमेवरील निप्पाणीतील पेट्रोल पंपावर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त दरात पेट्रोल उपल्बध अशा आशयाचे फलक लावले आहेत. त्यामुळे हे फलक लावून महाराष्ट्रातील जनतेला डिवचल्याची भावना व्यक्त होत आहे. सध्या मुंबईत पेट्रोलने 80 रुपयांचा टप्पा गाठला आहे.