भुसावळ : प्रवासी झोपल्याची संधी साधत चोरट्याने 50 हजारांचा ऐवज असलेली बॅग लांबवली. ही घटना रविवारी सकाळी सहाच्या सुमारास पाचोरा रेल्वे स्थानकावर घडली. महाराष्ट्र एकस्प्रेस या गाडीने योगेश बावस्कर (रा.मुक्ताईनगर, जि.जळगाव)हे प्रवास करीत असताना चोरट्यांनी ते झोपल्यानंतर चोरट्यांनी त्यांची ट्रॉलीची बॅग लांबवली. भुसावळ स्थानकावर गाडी आल्यावर येथील जीआरपी पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिल्यानंतर जीआरपी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पाचोरा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, बॅगेत सोन्याची अंगठी, कपडे, बुट आदी ऐवज होता.