महाराष्ट्र केसरी विजय चौधरी पोलिस सेवेत घेतल्याने

0

चाळीसगाव। ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी यांची सरळ सेवा भरती प्रक्रियेने पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त चाळीसगाव शहरात समजताच शहरातील घाट रोड स्थित परिसरात ढोल ताशांच्या गजरात जळगांव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. एकमेकांना मिठाई भरविण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

कुस्तीगीर संघातर्फे फोडले फटाके
यावेळी जिल्हा कुस्तीगीर संघाचे सेक्रेटरी शिवाजी राजपूत, तालुका कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष गोपाळ अग्रवाल, बाजार समितीचे सभापती रविंद्र पाटील, उपसभापती महेंद्र पाटील, संचालक धर्मा काळे, चा.ए.सोसायटीचे माजी संचालक मिलिंद देशमुख, अजय देशमुख, शिंपी समाजाचे युवा अध्यक्ष गणेश निकुंभ, राजेंद्र धामणे, सचिन देशमुख, विजय मराठे, बाळासाहेब राजपूत, मंगल राजपूत, अरुण वाणी, वसीम शेख रज्जाक, मनोज शर्मा, निखिल देशमुख, सुजय देशमुख तसेच स्व.बबनराव देशमुख कुस्तीगीर संघाचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.