महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी रविवारी पिंपळे सौदागर येथे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा

0

पिंपरी-चिंचवड :शहरातील कुस्तीपटूंना महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ आणि नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने रविवारी (दि.26) पिंपळे सौदागर येथे निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघातर्फे देण्यात येणारा ’जीवनगौरव’ पुरस्कार यंदा वस्ताद अर्जुन काटे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पै. दामु काटे आणि पै. भरत कुंजीर यांचा विशेष सन्मानाने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संजोयक नगरसेवक नाना काटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ आयोजित केलेल्या या स्पर्धा पिंपरी सौदागर पोलीस चौकी शेजारील कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत दुपारी तीन वाजता होणार आहेत.

काटे क्रीडानगरीत दुपारी उद्घाटन
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते रविवारी दुपारी तीन वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, ऑलिंम्पिक वीर मारुती आडकर, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, रुस्तम-ए-हिंद अमोल बुचडे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, उपमहाराष्ट्र केसरी सागर गरुड यांचे हस्ते होणार आहे.

रविवारी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत मल्यांचा वजन घेतले जाईल. त्यानंतर कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यासाठी दोन मैदाने तयार आहेत. मॅट आणि मातीवर कुस्ती स्पर्धा होणार आहेत. कुमार गटाच्या स्पर्धा मॅटवर घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेत 125 ते 150 मंल्ल सहभागी होतील. पत्रकार परिषदेवेळी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक हनुमंत गावडे, उपाध्यक्ष काळूराम कवीतके, संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे आदी उपस्थित होते.

रात्री आठला बक्षीस वितरण
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांच्या हस्ते रविवारीच सायंकाळी आठ वाजता विजेत्या मल्लांना स्ट्रॅक सूट आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, आमदार महेश लांडगे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, माजी महापौर रंगनाथ फुगे, बाबासाहेब तापकीर, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर, विद्यार्थी संघटनेचे सुनील गव्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत.