मुंबई- भाजपने सत्तेत येण्यापूर्वी राज्य टोलमुक्त करणार असे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन चार वर्षे उलटली मात्र अद्यापही राज्य टोलमुक्त झालेले नाही. अद्याप टोलमुक्त राज्य का केले नाही? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सरकारला केला जात आहे. भाजपने त्यांच्या गॅरंटी कार्डमध्ये अनेक आश्वासने दिले आहेत, मात्र आश्वासनपूर्ती करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरले आहे असे आरोप राष्ट्रवादीने केले आहे.
महाराष्ट्र टोलमुक्त करणार असं आश्वासन चार वर्षांपूर्वी भाजपाच्या गॅरंटी कार्डमध्ये देण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजपा सरकारला चार वर्षे पूर्ण होत आहेत. अद्याप महाराष्ट्र टोलमुक्त का झाला नाही?#जवाबदो@nitin_gadkari@CMOMaharashtra pic.twitter.com/iFcDbkuqJR
— NCP (@NCPspeaks) October 22, 2018