महाराष्ट्र दिनानिमित्त शाळा-महाविद्यालयात ध्वजारोहण

विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन : कामगार दिनाची मान्यवरांनी कार्यक्रमातून सांगितली महती

भुसावळ : 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त शहर व परीसरातील शाळा, महाविद्यालयांसह ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे ध्वजारोहण करण्यात आले. या निमित्त सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कामगार दिनानिमित्त मान्यवरांनी भाषणातून माहिती देत उद्बोधन केले.

म्युनिसीपल हायस्कूल, भुसावळ
भुसावळ : शहरातील म्युनिसीपल हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक ललित कुमार फिरके यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक डॉ.प्रदीप साखरे यांनी केले. प्रसंगी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

नाहाटा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ : भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.डॉ.वाय.के.चौधरी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उप प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील, डॉ.ए.डी.गोस्वामी, डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.एन.ई.भंगाळे, प्रा.उत्तम सुरवाडे, भगवान तायडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ताप्ती एज्युकेशन सोसायटी भुसावळ संचलित ताप्ती पब्लिक स्कूल तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

गाडगे बाबा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ- श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात महाराष्ट्र दिवस आंतरराष्ट्रीय श्रमिक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्यास्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायन केले व महाराष्ट्र गीत सादर केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, डॉ.पूनम त्रिवेदी, डॉ.जाधव, प्रा.गुप्ता, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.पंकज फालक, प्रा.शीबा खान तसेच शिक्षकेतर कर्मचारी अरुण कुडेकर, सुनील शर्मा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुध निर्माणीत कामगारांनी घेतली शपथ
भुसावळ : आयुध निर्माणी भुसावळ कामगार युनियनद्वारा परंपरेनुसार 1 मे जागतिक कामगार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य कार्यक्रम सकाळी नऊ वाजता युनियन कार्यालयात झाला. प्रथम लाल झेंड्याला सलामी, कामगार आंदोलनात शहिदांना श्रद्धांजली, सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन झाले.
आयुध निर्माणी भुसावळचे महाप्रबंधक वसंत निमजे अध्यक्षस्थानी होते. उपमहाप्रबंधक बी.देविचांद, राज्य उपाध्यक्ष अमृतराव महाजन, एशियन गोल्ड मेडल विजेता मोहम्मद आरीफ, सुरक्षा प्रमुख आर.एस.मेढे होते. कार्याध्यक्ष निलेश देशमुख, उपाध्यक्ष आशीष मोरे, किशोर बढे, योगेश अंबोडकर, खजिनदार संतोष बाविस्कर, मिलिंद ठोंबरे, प्रवीण बोईत, रोशन चौधरी, राजू तडवी, नितीन देशमुख, कामगार युनियनचे पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले. महासचिव दिनेश राजगीरे यांनी आभार मानले.