मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी मुंबईतील वरळीमधील एनएससीआय स्टेडियममध्ये राज्यातील विकासाचे नवीन मॉडेल सादर करणार आहेत. विकासाचे हे मॉडेल राज्यातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या विकास संबंधित प्रस्तावांद्वारे तयार केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस ह्या प्रसंगी राज्यातील सुमारे 12500 विद्यार्थी, विकासाशी थेट संबंधित असलेले अनेक आयएएस अधिकारी, उद्योगपती व विभिन्न विषयांमधील तज्ज्ञांच्या उपस्थितीमध्ये ’महाराष्ट्र व्हिजन 2025’ द्वारे राज्यातील विकासाच्या नवीन धारेचा शुभारंभ करतील.
महाराष्ट्र दिनी राज्यामधील हा सर्वांत मोठा व सर्वांत महत्त्वपूर्ण कार्यक्रम असणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा सहित उद्योग, बिजनेस, कला व शैक्षणिक जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तीसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. राज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ह्या कार्यक्रमाविषयी विशेष उत्सुकता आहे कारण त्यांच्याद्वारे देण्यात येणा-या विकासाशी संबंधित सूचनांनुसार मुख्यमंत्री राज्यातील विकासाच्या मॉडेलची घोषणा करतील.
महाराष्ट्रमध्ये ह्या प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम होणार आहे. ज्यामध्ये युवा पिढीच्या संकल्पने आधारे राज्याच्या विकासाची सुरुवात केली जाणार आहे. ह्या प्रसंगी एनएससीआय स्टेडियम परिसरामध्ये महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित 100 पेक्षा जास्त स्टॉल्स लावले जात आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांद्वारे प्रस्तुत विकासाचे अभिनव प्रदर्शन असेल. ह्या प्रदर्शनाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे विद्यार्थी राज्याच्या विकासाच्या नवीन संकल्पना सादर करतील. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित संकल्पना संकलित करण्यासाठी राबवण्यात आलेल्या ‘ट्रांसफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रमाचा समापन समारोह म्हणून आयोजित होणा-या ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र दिनाच्या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीसांद्वारे महाराष्ट्राच्या विकासाच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली जाईल. ह्या कार्यक्रमामध्ये राज्याच्या विकासाशी संबंधित सर्व विभागांचे मंत्री, अधिकारी व अन्य यंत्रणांचे लोकसुद्धा ‘महाराष्ट्र विजन 2025’ निमित्ताने विशेष प्रकारे उपस्थित राहतील. दोन सत्रांमध्ये होणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या विकासाची दिशा बदलणारा ठरणार आहे.
महाराष्ट्र सरकारद्वारे संचालित एमएमआरडीए, सिडको, महाराष्ट्र पर्यटन, एनएससीआय आणि ओला इत्यादींच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणा-या ह्या कार्यक्रमामध्ये राज्यातील 82 शहरांमधील 654 महाविद्यालयांच्या 12500 विद्यार्थ्यांद्वारे रोजगार वाढवण्यासाठी औद्योगिक विकास, कृषि विकासातून समृद्धी, ग्रामीण क्षेत्रामध्ये शैक्षणिक विकास, दुष्काळमुक्त महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र इत्यादी विषयांवर एकूण 2315 कल्पना मिळाल्या. त्यातील 11 विशेष कल्पनांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री त्या 11 विषयांशी अनुरूप विकास कार्यक्रमांचे मॉडेल प्रस्तुत करतील.
मुख्यमंत्री फडणवीस ह्या प्रसंगी विद्यार्थ्यांद्वारे सादर केलेल्या विकासाच्या एकूण 11 अभिनव संकल्पना प्रस्तुत करतील. मिळालेल्या एकूण 2315 संकल्पनांमधून ह्या संकल्पना विविध विषयांच्या तज्ज्ञांद्वारे निवडण्यात आल्या आहेत. विकासाच्या ह्या सर्व कल्पनांना सुमारे 6 लाख लोकांनी ऑनलाइन अनुमोदन दिले आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्ताने 1 मे रोजी मुंबईमध्ये ‘एनएससीआय’ मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ यांचे विचार जाणून घेणार आहेत. राज्यातील 100 हून अधिक शहरांमधून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या प्रगतीच्या कल्पना मांडणारे विशेष प्रदर्शनदेखील मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय विज्ञान संस्थेच्या सहा विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर राज्याच्या विकासाविषयी आपल्या कल्पना मांडतील. या विद्यार्थ्यांमध्ये वैभव चिचमलकर, अम्रीता पवित्रण, अनुराग गेचुडे, मीनल सोनवणे, क्रिष्णेंदू रॉय आणि स्वाती अय्यर यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. सुजाता देव, डॉ. अभय खांबोरकर, डॉ. रामदास लिहितकर यांनी दिली. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब असून या उपक्रमातून राज्याला विधायक विचार मिळतील, असे मत संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम यांनी व्यक्त केले.