महाराष्ट्र दिनी लेवा पाटीदार समाजाच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन 

0

पिंपरी-चिंचवड । समता भ्रातृ मंडळ, जळगांव जिल्हा लेवा समाज मंडळांच्यावतीने महाराष्ट्र दिनी स्नेहमेळावा, स्नेहभोजन, महाराष्ट्र दिन, कामगार दिन, दोन्ही मंडळाचा वर्धापनदिन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 1 मे 2018 रोजी दुपारी 3.30 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. भक्ती-शक्ती येथील श्री कृष्ण मंदिराशेजारच्या भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. सर्व समाजबंधुंनी उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळांच्यावतीने करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी लेवापाटीदार समाजाचे कुटुंबनायक मा. श्री. रमेश विठू पाटील, भोसरीचे आमदार महेश लांडगे, नगरसेवक नामदेव ढाके, उद्योजक डी. डी. पाटील, नाशिकचे मा. डॉ. प्रमोद महाजन, अध्यक्ष रविंद्र बर्‍हाटे तसेच लेवा पाटीदार समाजातील उद्योजक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील, उच्चशिक्षित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांचे समाजप्रबोधन पर मार्गदर्शन होणार आहे. गुणवंत कामगारांचा सत्कार समारंभ, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरिक, वारकर्‍यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मुलांसाठी कॅरम, बुद्धिबळ, स्मरणशक्ती, संगीत खुर्ची आदी खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे.