शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने 1 मे 2017 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या औचित्यावर संस्थानच्या कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी, संस्थानचे विश्वस्त सचिन तांबे, उपकार्यकारी अधिकारी डॉ.संदिप आहेर, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री, सुर्यभान गमे, उत्तम गोंदकर, दिलीप उगले, अशोक औटी, मुख्यलेखाधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे आदि उपस्थित होते. 1 मे या कामगार दिनाच्या औचित्यावर श्री साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयाच्या नेत्ररोग तज्ञ डॉ.मनिषा अग्रवाल, आय.टी.आय.चे निदेशक घनशाम राणे, साईनाथ रुग्णालयाच्या परिचारीका प्रणाली सोमन, साईबाबा हॉस्पिटलच्या परिचारीका रंजना शिंदे, लेखाशाखा विभागाचे लिपिक राजेंद्र कोळगे, सभाकामकाज विभागाचे लिपिक अनिल थोरात, विद्युत विभागाचे लिपिक पांडुरंग बकरे, मेकॅनिकल विभागाचे लिपिक शरद डोखे, साईआश्रम भक्तनिवासस्थानचे लिपिक सुभाष गायके, जनसंपर्क विभागाचे लिपिक महेंद्र मुरडे, लाडू निर्मिती विभागाच्या कुपन विक्रेत्या वैशाली कोते, संरक्षण विभागाचे पहारेकरी सुदाम कोते, वाहन विभागाचे वाहन चालक भाऊसाहेब कोकाटे, श्री साईप्रसादालय विभागाच्या मदतनीस लता बनकर, मंदिर विभागाचे मदतनीस सोन्याबापू बनकर, अभिलेख कक्षाचे मदतनीस बाळासाहेब गाडे, सी.सी.टी.व्ही.विभागाचे मदतनीस वाल्मिक धरम, बांधकाम विभागाचे मदतनीस विक्रम जाधव, माहिती तंत्रज्ञान विभागाचे कंत्राटी कर्मचारी संजय गिरमे, आरोग्य विभागाचे कंत्राटी कर्मचारी राजेश गिगना व संरक्षण विभागाचे कंत्राटी सुरक्षारक्षक रामदास धिवर आदि 21 कर्मचा-यांचा आदर्श कर्मचारी म्हणून सत्कार करण्यात आला.
यावेळी साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कुलचे क्रिडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांना महाराष्ट्र राज्य क्रिडा महासंघ व अहमदनगर जिल्हा क्रिडा संघ यांच्या वतीने आदर्श क्रिडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याने श्री.कोहकडे यांचा व संस्थानच्या श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा फिटर ट्रेडचा विद्यार्थी कु.अनिकेत देविदास औताडे हा राज्यात प्रथम आल्याने मे 2017 मध्ये कानपूर येथे होणाऱ्या 52 व्या आखिल भारतीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी त्याची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा अनिकेत औताडे हा राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधीत्व करणारा 21 वा विद्यार्थी आहे. याप्रसंगी संस्थानच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरचे शिक्षक वसंत वाणी यांनी केले.