शहादा । शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील खड्डे भरण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डाँ. सुधीर गवळी यांना निवेदन देण्यात आले. डोंगरगाव रोड लगत शारदा नगरला लागुन रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत. सदर खड्डे हे तापी पाणीपुरवठा योजने अंतर्गत टाकण्यात आलेल्या पाईप लाईन मुळे झाले आहेत. पावसाचे पाणी खड्यात साचल्याने नागरिकाना या खड्याचा अंदाज येत नाही. परिणामी येथे मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. हे खड्डे बुजण्यासाठी नागरीकानी स्वखर्चाने तीन वेळामुरुम टाकला मात्र खड्डे आहे ते त्याच स्थितीत आहे.कायम वर्दळीचा रस्ता असल्याने हे खड्डे बुजविणे आवश्यक आहे अन्यथा परिसरातील नागरिक पालिकेवर मोर्चा आणतील व भविष्यात या खड्यामुळे काही अपघात झाला तर त्याला पालीका प्रशासन जबाबदार राहिल असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष कौस्तुभ मोरे,स्वप्नील पाटील,शरद पायील, कौशल मोरे ,पंकज बेहरे,हर्षल पाटील, देवेंद्र बोरसे, धिरज साळुंके आदि मनसे सैनिक उपस्थित होते