महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे 2 ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्रात जनसंघर्ष यात्रा

0

विचार विनीमय करण्यासाठी फैजपूरात उद्या पदाधिकार्‍यांची बैठक

फैजपूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे आयोजित जनसंघर्ष यात्रा 2 ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्र विभागात येत असून या यात्रेचा शुभारंभ फैजपूरच्या ऐतिहासिक भूमीतून होणार आहे. त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांची एक बैठक बुधवार, 19 रोजी दुपारी एक वाजता माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली धनाजी नाना महाविद्यालयात होत आहे. काँग्रेस प्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन यावल तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, रावेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केले आहे.