महाराष्ट्र प्रवर्तनी डॉ.पु.श्री ज्ञानप्रभाजी यांचे भुसावळात होणार आगमन

0

संतोषी माता हॉलमध्ये 18 जुलैला सभा : उपस्थितीचे आवाहन

भुसावळ- महाराष्ट्र प्रवर्तनी डॉ.पु.श्री ज्ञानप्रभाजी म.सा. यांचे भव्य चातुर्मासानिमित्त भुसावळ शहरात 18 रोजी आगमन होणार असून संतोषी माता हॉलमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी समाज बांधवानी उपस्थित राहण्याचे श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाने आवाहन केले आहे.
चातुर्मासानिमित्त डॉ.पू.श्री ज्ञानप्रभाजी म.सा.आदी ठाणा 9 यांचे बुधवारी शहरात आगमन होणार असून सकाळी 8 वाजता भव्य शोभायात्रा काढली जाणार आहे तसेच त्यांच्या आगमनानिमित्त मंगळवारी सकाळी ते 7 वाजेपासून बुधवारी त्यांचे आगमन होईपर्यंत सुराणा साधना भवनात नवकार मंत्राचा अखंड जप केला जाणार आहे. त्यानंतर जपाचा समारोप करून शोभायात्रा संतोषी माता हॉलकडे रवाना होवून त्याठिकाणी विशेष सभा घेतली जाणार आहे. यासाठी शहरातील समाज बांधवानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे तसेच समाज बांधवानी बुधवारी आपापले व्यवसाय दुपारी एक वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे संघपती प्रेमचंद चोपडा, कार्याध्यक्ष गौतम चोरडीया, महामंत्री कांतीलाल चोरडीया, जे.बी.कोटेचा यांनी केले आहे.