जळगाव। रिझर्व बँक ऑफ इंडीया यांच्या सुचनेनुसार सर्व राष्ट्रीय बँकांना 5 ते 9 जून दरम्यान ’फायनांसिअल लिटर्सी विक’ चे आयोजन करण्यात आले आहे. बॅक ऑफ महाराष्ट्र गणपती नगर शाखा यांच्या अंतर्गत ही मोहीम तांबापूर, मेहरूण परिसरात ही शिबीराचे आयोजन करण्यात आले.
या शिबीरमध्ये शाखा प्रबंधक पल्लव राजपूत यांनी विविध योजनेंची उपस्थितांना माहिती दिली. केवायसी, आधार लिकिंग, ऑनलाईन बॅकींग, मोबाईल अॅप, क्रेडीट डिसिप्लाइन या बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी अभिषेक पटेल, मोहम्मद शाहिद, महेश सानप यांची उपस्थिती होती.