महाराष्ट्र बँकेचे शेअर कोसळले; डीएसके कर्जप्रकरणाचा परिणाम

0

नवी दिल्ली- बँक ऑफ महाराष्ट्राचे शेअर गुरुवारी मोठ्या प्रमाणात कोसळले. शेअर मार्केटचे कामकाज सुरु झाल्यानंतर ७ टक्के खाली येऊन १२.५० रुपये प्रती शेअर या दरावर महाराष्ट्र बँकेचे शेअर आले आहे. बुधवारी बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना गैरप्रकारे कर्जवाटप केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना अटक करण्यात आली त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून महाराष्ट्र बँकेचे शेअर कोसळले आहे.

बुधवारी महाराष्ट्र बँकेचे शेअर १३.४७ वर बंद झाले होते. मात्र गुरुवारी कामकाज सुरु झाल्यानंतर शेअर १२.५० वर आले. वर्षभरापूर्वी महाराष्ट्र बँकेचे शेअरचे दर २९.२ रुपये होते आता वर्षभरानंतर शेअर १२.५० रुपयावर आले आहे.