मराठा आरक्षण आंदोलन खडकीतही
खडकी- मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण खडकी परिसरात ही पसरले असुन मंगळवारी सकाळी येथिल मराठा समाजाच्यावतीने शांततेमध्ये रॅलीकाढण्यात आले. यावेळी आंदोलकांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. मराठा क्रांती मोर्चाने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेस येथिल सकल मराठा समाजाने प्रतिसाद देत शासनाचा निषेध केला. मराठा आरक्षणाच्या मागणीकरीता औरंगाबाद कायगाव येथे सोमवारी ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरूणाने नदी पात्रात उडी मारुण आत्महत्या केली. कानडगाव (ता.गंगापुर) येथिल काकासाहेब शिंदे या अठ्ठावीस वर्षीय तरुणाने आत्मसमर्पण केले. या घटनेनंतर संतप्त आंदोलकांनी राज्यभर आपले आंदोलन तीव्र करीत शासनाचा निषेध केला.
दुकाने ठेवली बंद
मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला मराठा समाजाने प्रतिसाद दिला. मोठ्या संख्येने एकत्रीत येऊन शांततेने रॅली काढली. तसेच दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार खडकी बाजार परिसरातील व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली. रॅलीचा समारोप येथिल शिवाजी पुतळा चौक येथे करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या लढ्याकरीता आपल्या प्राणाची आहुती देणारे काकासाहेब शिंदे यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.