महाराष्ट्र बंदच्या हाकेला नगरदेवळ्यात प्रतिसाद

0

नगरदेवळा । मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला नगरदेवळा येथे उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासून सर्वच दुकाने कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत शेकडो तरुण रस्त्यावर उतरले होते. आऊट पोस्ट नगरदेवळा येथे निवेदन देण्यात आले. तसेच शासनाने आरक्षणा संदर्भात त्वरित निर्णय न घेतल्यास पुढील परिणामास शासन जबाबदार राहील, असा ईशारा देण्यात आला . गावातील व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवत पाठींबा दिला. यावेळी सागर पाटील, नामदेव पाटील, संदीप पाटील, नारायण पाटील, रविंद्र पाटील , निलेश पाटील, मनोज पाटील, कडू पाटील, भूषण पाटील, मिलिंद पाटील, राज पाटील, अजय पाटील यांसह सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंद दरम्यान गावात पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह नगरदेवळा आऊट पोस्टचे ज्ञानेश्‍वर पाटील, विनोद पाटील, नरेंद्र विसपुते, राजू पाटील, जिजाबराव पवार यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला.