पाचोरा। पाचोरा येथे उद्या होणार्या सोमवारी 5 जून रोजी होणार्या महाराष्ट्र बंद ला शिवसेनेचा जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे. 1 जून पासून महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेलेला असून शेतकर्यांच्या कर्जमाफीबद्दल अजूनही सरकार सकारात्मक निर्णय घेत नाही. त्यामुळे शिवसेना तरी सत्तेत असली तरी शेतकर्यांच्या न्याय व हक्कासाठी शिवसेना सोमवारी पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व शिवसैनिक शेतकरी बांधवांसोबत रास्ता रोको करणार आहे.
शहरातील महाराणा प्रताप चौक भडगाव रोड, पाचोरा येथे शासनाच्या निषेधार्थ रास्ता रोका व भाजीपाला, दुध, शेतकर्यांच्या ज्या शेतमालाला भाव नाही असा माल रस्त्यावर आणून फेकतील व तो माल गो माता गायींना खायला दिला जाणार आहे, अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले. तसेच पाचोरा-भडगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित राहणार आहे. दोन्ही तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, मार्केट कमेटीचे संचालक यांच्यासह ग्रामीण भागाीतल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा भडगाव शिवसेनातर्फे करण्यात आले आहे.