मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याविरोधात आज शुक्रवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बंद पाळला जातो आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बंदला हिंसक वळण लागले आहे. मुंबई, औरंगाबादमध्ये बसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेने खबरदारी घेतली आहे. मात्र काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.