‘महाराष्ट्र बंद’ आंदोलकांवरील गुन्हे कमी करणार

0

केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंचे आश्‍वासन

मुंबई : भिमाकोरेगाव हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ झालेल्या उत्स्फूर्त ‘महाराष्ट्र बंद’ आंदोलनात सहभागी झालेल्या निरपराध आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नयेत; आंबेडकरी वस्त्यांमध्ये कोंबिंग ओपरेशन करून नये, तसेच आंदोलकांवर कलम 307 प्रमाणे झालेले अनावश्यक गुन्हे कमी करावेत यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी केली आहे.

तसेच येत्या सोमवार, 15 जानेवारी रोजी मुंबई ठाण्यातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक बांद्रा पूर्व एम आय जी क्लब येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.मुंबई ठाणे कल्याण आदी भागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी; डीसीपी तसेच ग्रामीण भागातील जिल्हा पोलीस अधीक्षकांशी केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले संपर्क साधून कार्यकर्त्यांवरील अनावश्यक गुन्हे रद्द करण्यासाठी तसेच आरोपी आंदोलकांची अतिरिक्त संख्या कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे निरपराध लोकांवर शांततेत आंदोलन केलेल्यांवर गुन्हे दाखल करू नयेत यासाठी सूचना केल्या आहेत. मुंबई ठाण्यात झालेल्या आंदोलनाचा आणि त्यात सहभागी कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे कमी करण्यासाठी सोमवार 15 जानेवारी रोजी रिपाइंतर्फे आढावा बैठक आयोजित केली असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.