महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

0

जळगाव। महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा 14 मे रविवार रोजी जैन हिल्स जळगाव येथे अध्यक्ष अशोक जैन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून त्यात 11 ठराव पारीत करून संघटनेच्या विरोधात कार्य करणारे मुंबईचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र डोंगरे यांना सर्वानुमते संघटनेच्या उपाध्यक्ष पदावरून व सभासदत्वापासून त्यांना कायम स्वरूपी काढण्यात आले. महाराष्ट्र राज्य बुद्धीबळ संघटनेच्या अध्यक्षपदी अशोक जैन असून धर्मदाय आयुक्त पूणे यांच्यसा आदेशानुसार संघटनेच्या सभा सुरू आहे.

खैरनार अ‍ॅण्ड खैरनार पुढील वर्षासाठी ऑडीटर
या सभेत संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष यांच्यावर संघटनेच्या विरोधात गैरकृत्य केल्याबाबत संघटनेचे सहसचिव फारूक शेख यांनी दिली अहवाल सभेसमोर मांडला असता त्यांना संघटनेच्या पदासोबत सभासदत्व रद्द करण्याचा ठराव पारीत झाला होता. त्या अनुषंगाने काळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब होऊन त्यांची हकालपट्टी करण्यात आली. पारीत झालेले इतर ठराव मागील वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वार्षिक लेखाजोगा कार्यकारी मंडळाने पास केलेले ठरावास मान्यता, जळगावचे खैरनार अ‍ॅण्ड खैरनार यांची पुढील वर्षासाठी ऑडीवर म्हणून मान्यता, वार्षिक अहवालास मंजुरी, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेच्या केलेल्या कोर्ट केसची माहिती व संघटनेवर झालेल्या कार्यवाहीची माहिती देऊन ते ठराव पारीत करण्यात आले. आयत्यावेळेवरील विषयात महापौर चषक (मुंबई) स्पर्धा संघटना येणार नाही इत्यादी ठराव पारीत करण्यात आले.

सभेत 25 जिल्ह्यांचा सहभाग
सभेत 36 जिल्ह्यापैकी एकुण 25 जिल्ह्याचा समावेश होता. चर्चेत पी.बी. भिल्लारे, विलास म्हात्रे, रतन लिगाडे, सिद्धार्थ मयुर , दिपक कुमणकर, निनाद पेंढसेकर व अ‍ॅड. आपणकर, भरत चौधुले, चंद्रकांत वडावळे, मंगेश गंभीरे, यशवंत बापट, अंकुश रक्ताळे, संदीप साळुंखे यांनी सहभाग घेतला. सभेचे सुत्रसंचालन व आभार फारूक शेख यांनी केले.