‘महाराष्ट्र बॉडीबिल्डर असो.’च्या संघटन सचिवपदी अनिल गोरे

0

धुळे । धुळे जिल्हा बॉडी बिल्डर्स असो.चे अध्यक्ष अनिल गोरे यांची महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असो.च्या संयोजक सचिवपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नूकतीच चिंचवड, पुणे येथे झाली. त्यावेळी 27 जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यातूनच राज्य कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यात धुळ्याला अनिल गोरे यांच्या माध्यमातून संयोजक सचिवपदाची जबाबदारी मिळाली. या बैठकीत राज्याध्यक्ष म्हणून आमदार महेश लांडगे, मुख्य सल्लागार डॉ.संजय मोरे,चेअरमन मिहीर कुळकर्णी, खजिनदार राजेश सावंत, सचिव राजेंद्र सातपुरकर, राजेंद्र चव्हाण तर उपाध्यक्ष म्हणून नामदेवराव मोहिते, बिभीषण पाटील, मनोहर पांचाळ, अजिंक्य वाघ, राजेश राऊत, प्रशांत आपटे, राजु सुरसे यांची निवड करण्यात आली.

तरुणांमध्ये व्यायामासह शरीर सौष्ठवाची केली निर्माण आवड
संयोजन सचिव म्हणून अनिल गोरेंसह अरुण मोरे, मनोज गायकवाड यांची तर सहसचिव म्हणून नरेंद्र कदम, मारुती आरकर,प्रमोद काटे, मंदार आगवनकर यांची निवड झाली. सदस्य म्हणून रविंद्र आठळे, महाबळ सालीवन, भागवत बाराट, शिवपुत्र कसबे, विक्रम भोगाडे, अवतारसिंग रामगाधिया, राजेश रानगड, रोषण सावंत, जयंत गिते, अजय चौकेकर, नितीन भिलारे यांची निवड झाली. रामकृृष्ण चितळे हे कार्यालयीन सचिव म्हणून काम पहाणार आहेत. अनिल गोरे यांनी डॉ.संजय मोरे यांच्या आशीर्वादाने आणि राजेंद्र सातपुरकर यांच्या मार्गदर्शनाने धुळ्यात बॉडीबिल्डर्सचे काम सुरु केले. धुळे जिल्हा हौशी त्यांची धुळे जिल्हा बॉडी बिल्डर्स असो.च्या अध्यक्षपदी निवड झाली होती.