महाराष्ट्र भुषण पुरस्काराने पाटील यांचा गौरव

0

भुसावळ। तालुक्यातील निंभोरा येथील रहिवासी तथा नूतन मराठा विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक सुधाकर पाटील यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेत नागपूर येथे विदर्भ कला साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात 2017 चा महाराष्ट्र भुषण पुरस्कार देण्यात आला. राज्यमंत्री सुरेखा कुंभारे यांनी प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पदक देवून पुरस्कार प्रदान केला.

अंधश्रध्देबद्दल ग्रामीण भागात जाऊन केली जनजागृती
सुधाकर पाटील यांच्या शैक्षणिक, वैज्ञानिक, सामाजिक, क्रीडा, साहित्य, पर्यावरण आणि समाज प्रबोधन अशा विविध विषयांची परिषदेकडून दखल घेण्यात आली. त्यांचे विज्ञान प्रदर्शनातील देशपातळीवरील आजपर्यंतचे रेकॉर्ड कायम आहे. अनेक विद्यालय, महाविद्यालय तसेच सार्वजनिक कार्यक्रमांमधून अंधश्रध्दा निर्मुलनात त्यांनी प्रयोगांद्वारे जनजागृती केली आहे. त्यांनी खेडोपाडी जाऊन नागरिकांना अंधश्रध्दा व बुवाबाजीतून बाहेर काढण्यात प्रयत्न केला आहे. त्यांना यापुर्वीदेखील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले आहे. सुधाकर पाटील यांच्या या गौरवाबद्दल विविध समाजिक संघटनांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.