महाराष्ट्र मिशन 1 मिलियनच्या निमित्ताने फुटबॉल क्रांती रुजवणार

0

मुंबई। जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. 17 वर्षांखालील फिफा वर्ल्डकप स्पर्धेनिमित्त राज्यात 8 सप्टेंबर 2017 रोजी 10 लाख मुलेमुली शाळांमधून फुटबॉल खेळणार असल्याने यादिवशी ऐतिहासिक मिशन साकार होणार आहे.

यानिमित्ताने अवघा महाराष्ट्र आनंदाचे क्रीडांगण बनेल, असा विश्‍वास शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला आहे.फिफा विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने महाराष्ट्र मिशन 1 मिलियन – फुटबॉल क्रांती निर्माण करण्यात येणार आहे. यासंदर्भातील पत्रकार परिषद आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती.

येणारा काळ फुटबॉलमय
कार्यक्रमात तावडे यांनी येणार्‍या काळात महाराष्ट्र फुटबॉलमय कसे होणार आहे याविषयी माहिती दिली. यावेळी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष विश्वजित कदम, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजी राजे भोसले आदी उपस्थित होते. तावडे यावेळी म्हणाले की, अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय होण्याबरोरबच यानिमित्ताने महाराष्ट्र मिशन 1 मिलियन साध्य करताना 30 हजारांहून अधिक शाळांमध्ये सुमारे 1 लाख फुटबॉलचे वाटप करण्यात आले आहेत.