महाराष्ट्र राज्य अपंग समावेशित कृती समितीचे धरणे आंदोलन

0

जळगाव: अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक सत्र अंतर्गत २००९ नंतर नियुक्त विशेष शिक्षक यांची होऊ घातलेली अन्यायकारक तपासणी रद्द करणे, समायोजनाचा शासन निर्णय निर्गमित करणे, थकीत नियमित वेतन तत्काळ करण्यासाठी ५ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्याना आपले निवेदन सादर करतांना, ७ जुलै २०१५ शासन परिपत्रकानुसार शिक्षकांनी औरंगाबाद येथील खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती. खंडपीठाने शिक्षकांच्या बाजूने निर्णय देत वैयक्तिक मान्यतेसह सेवा शाळा स्तरावर पुन: प्रस्थापित करणे, तसेच थकीत वेतन देण्याचे निर्देश दिले होते.

संघटनेद्वारा सातत्याने आंदोलन, पत्रव्यवहार केला असुन शासनाच्या आदेशान्वये संघटनेला विश्वासात घेवून शिक्षण संचालक पुणे यांनी विशेष शिक्षकांच्या समायोजनाचा प्रस्ताव विशेष शिक्षक यादी सादर केली आहे. एक वर्षापेक्षा अधिक काळ लोटूनही शासनाकडू धोरणात्मक असा निर्णय घेण्यात आला नाही. आजपर्यंत राज्यात १३ तरुण विशेष शिक्षक शासकीय मनस्तापामुळे मृत्यू पावले असल्याचे आपल्या निवेदनात म्हटले आहे.

२७ जानेवारी २०२० पासून उरू करण्यात आलेली विशेष शिक्षक दस्तावेज तपासणी तत्काळ रद्द करण्यात यावी. विशेष शिक्षक व परिचर यांचे थकीत व नियमित वेतन तात्काळ अदा करण्याची मागणी केली आहे.