महाराष्ट्र राज्य दिनानिमित्त पोलीस परेड

0

चाळीसगाव । यंदा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 57 वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांमध्ये महाराष्ट्र स्थापनादिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वर्धापन दिनानिमित्त सोमवारी 1 रोजी चाळीसगाव शहरातील पोलीस परेड कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात एकाचवेळी होणार कार्यक्रम
सकाळी 8:00 वाजता चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड कवायत मैदानावर ध्वजारोहण समारंभाचे उद्घाटन होणार आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना या समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी सकाळी 7:15 ते 9:00 वाजेदरम्यान शहरात ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू येणार नाही. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेस आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल त्या कार्यालय अथवा संस्थांनी तो समारंभ सकाळी 7:15 वाजेपूर्वी किंवा 9:00 वाजेनंतरच करावा.शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांना 1 मे रोजी आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या ध्वजारोहण सोहळयात सहभाग घ्यावा असे आवाहन तहसिलदार कैलास देवरे यांनी केले आहे.