पाचोरा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषद तालुका शाखा पाचोराची नविन कार्यकारणी पदग्रहण सोहळा 15 जुलै रोजी येथील अल्पबचत भवनात जि.प.अध्यक्षा उज्वलाताई पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रदिप जाधव यांनी केले. तर नवनियुक्त कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण नियुक्ती पत्रक मान्यवरांच्याहस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिक्षण क्रिडा व आरोग्य सभापती पोपट भोळे, पं.स. सभापती सुभाष पाटील, जि.प.सदस्य मधुभाऊ काटे, पं.स.सदस्य बन्सीलाल पाटील, पं.स.सदस्य रत्नप्रभा पाटील, पं.स.सदस्य अनिता पवार, पं.स.सदस्य कैलास चौधरी, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर सोनार, भाजपा शहराध्यक्ष नंदु सोमवंशी, राजेंद्र सपकाळे, पंकज पालिवाल, रविंद्र काकडे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप जाधव, तालुकाध्यक्ष जगन कोळी यांची उपस्थिती होती.
संघटनेच्या पाठीशी आम्ही भक्कम राहणार : शिक्षण समिती सभापती पोपटतात्या भोळे यांनी भाषणात बोलतांना सांगितले की, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषद ही राज्यातील शिक्षकांचे जिव्हाळ्याच्या समस्या सोडवुन न्याय देणारी एकमेव संघटना असुन जळगाव जिल्ह्यात गणवेश घोटाळा व शापोआ बाबत मुख्याध्यापक व शिक्षकांवरील झालेल्या अन्याया बाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष, जि.प.सदस्य, पं.स.सदस्य आपल्या संघटनेच्या पाठीशी भक्कम उभे राहु. वेळ पडल्यास आपण सर्व मंत्रालयात जावुन मंत्री ग्रामविकास पंकजाताई मुंडे यांना सत्यता लक्षात आणुन देणार व शिक्षकांना न्याय देण्याचा निश्चित प्रयत्न करण्यासाठी कटीबद्ध राहणार आहे.
शापोआची चौकशी करून होणार कारवाई : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परीषदेची राज्यभरातली घौडदौड अत्यंत चांगली असुन जिल्ह्यात या संघटनेने अनेक शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. गणवेश घोटाळा व शालेय पोषण आहारा (शापोआ)चा प्रश्न गंभीर आहे याबाबत चुकीच्या निर्णयामुळे हकनाक मुख्याध्यापक व शिक्षकांवर कारवाई होते. हे आमच्या ही निदर्शनास येत आहे आता कोणतीही चौकशी पारदर्शी होवुन दोषी असणार्यांवर कारवाई केली जाईल. शापोआ बाबत मुख्याध्यापक व शिक्षकांनी कुठलाही दबावाला बळी न पडता निकृष्ट दर्जाचा धान्य माल घेवून नये किंवा आता यापुढे बदलणार्या धोरणानुसार खरेदी करू नये, असे जि.प.उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी बोलतांना सांगितले.
यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
सदर कार्यक्रमास विवेक बाविस्कर, सुभाष लोखंडे, दिलिप सोनवणे, श्रावण दुधे, कैलास मोरे, अभिमन विसावे, रमेश महालपुरे, ज्ञानेश्वर जाधव, संभाजी हावडे, तन्वीर शेख, ईश्वर बडगुजर, विशाल धांडे, विश्वनाथ भिवसने, कृष्णा तपोने, अशोक महाले, सतिश लवटे, समाधान पाटिल, किरण महाजन, संजय ठाकरे, नामदेव पाटिल, मनोज दुसाने, अतुल साळुंखे, अमरचंद चौधरी, अनिल पाटिल, गणेश पाटिल, डॉ.वाल्मिक अहिरे, एजाज बागवान, सुनिल पाटिल, नवल ठोंबरे, अनिल जाधव, राहुल सोनवणे, कुभांर सर, कृष्णा पाटिल, संजय मोरे, प्रणिता परदेशी यांच्यासह पदाधिकार्यांनी यशस्वितेसाठी प्रयत्न केले.