महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे शालेय साहित्य वाटप

0

जळगाव। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे जळगाव जिल्ह्यातील पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते बांधव तसेच शाळेने नामनिर्देशित केलेल्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय साहित्याचे वाटप रविवार 9 जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे यांनी दिली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा सचिव सुनील भोळे, महागनराध्यक्ष अजय वाघ, माजी जिल्हाध्यक्ष इम्रान शेख, जिल्हा उपाध्यक्ष संजय तांबे, भुषण महाजन, तालुकाध्यक्ष किशोर झोपे आदी उपस्थित होते.

यांची राहणार उपस्थिती
मोफत शालेय वाटपाचा कार्यक्रमाचे रविवार 9 जुलै रोजी कांताई सभागृहात सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटक म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन तर अध्यक्ष म्हणून सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुरेश जैन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, जि. प. अध्यक्षा उज्वला पाटील, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, संघाचे प्रदेश सरचिटणीस विश्‍वासराव अरोटे, विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, डॉ. पराग कोचूरे, उद्योजक रजनीकांत कोठारी आदी उपस्थित होते.

600 जणांनी केली नाव नोंदणी
जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येकाच्या दोन पाल्यांना हे शालेय साहित्यवाटप करून मदत केली जाणार आहे. 600 जणांनी नावनोंदणी केली आहे. गरीब घटकातील विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्य वाटप करण्यात येणार असून याअंतर्गत विद्यानिकेतन व गुळवे शाळेतील 75 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला येतांना पाल्य व पालक यांनी सोबत येणे बंधनकारक आहे.