महाराष्ट्र विद्यापीठ कायदा आता मोबाईल अ‍ॅपवर

0

मुंबई । महाराष्ट्र विदयापीठ कायदा 2016 च्या अ‍ॅपचे आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृह येथे उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र विदयापीठ कायदा 2016 हे अ‍ॅप महेश निलजे यांनी तयार केले आहे. हे अ‍ॅप तयार करण्यासाठी श्री. निलजे यांना जवळपास 7 महिन्यांचा कालावधी लागला असून या अ‍ॅपमध्ये एकूए 16 प्रकरणांचा समावेश असून एकूण 17 शेडयूल यामध्ये आहेत. हे अ‍ॅप निलजे यांनी विकसित केले असून हे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत उपलब्ध आहेत. अँड्राईड मोबाईल फोनमध्ये गुगल स्टोरमधून एमपीयुए या नावाने हे अ‍ॅप डाऊनलोड करता येणार आहे.

ऑस्ट्रेलिया विद्यापीठात संशोधन करणार्‍या विदयार्थ्यांनी संधी
महाराष्ट्रातून साऊथ वेल्स विदयापीठामध्ये संशोधन करण्यासाठी जाणार्‍या विदयार्थ्यांनी त्यांच्या संशोधनाचा वापर लोकल टू ग्लोबल करावा असे मत व्यक्त करतानाच या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात जाऊन संशोधन करण्याची अधिक संधी मिळेल, असा विश्‍वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला.

ऑफलाईनमध्येही उपयोग
एकदा हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर ऑफलाईनमध्येही मोबाईल धारकांना याचा उपयोग करता येईल. महेश निलजे हे श्री. विजयसिंह यादव महाविद्यालय, पेठ वडगाव, जि. कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. हे अ‍ॅप निलजे यांनी विकसित केले असून हे मराठी आणि इंग्रजी या दोन भाषेत उपलब्ध आहेत. आज या पच्या उदघाटनाच्या वेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव सिध्दार्थ खरात, महाराष्ट्र राज्य महाविदयालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे महासचिव रावसाहेब त्रिभुवन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संबंधित व ईतर मान्यवर मोथ्या संख्येने उपस्थित होते.