जळगाव । महाराष्ट्र विश्वकर्मा संघटनेमार्फत झाडे लावा झाडे जगवा उपक्रम 5 रोजी सायंकाळी 4 वाजता विश्वकर्मा मंदीर परिसर व जळगाव परिसरात किसनराव नगर, सब स्टेशनसमोर, वाघनगर रोड, जळगाव याठिकाणी घेण्यात येणार आहे. यावेळी रक्तदान शिबीराचे सुद्धा आयोजन केलेले असून रक्तदातास सदिच्छा भेट म्हणून एक झाड देवून त्याचा गौरव करण्यात येणार असून जवळपास 100 लावण्याचा संकल्प योजिला आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी आ. सुरेश भोळे, अध्यक्ष कैलास डी. मोरे, प्रा. कृष्णा सोमवंशी, ज्येष्ठ समाजसेवक एम.टी. रुल्हे, हरी लोहार, डॉ. बी. डी. सुतार, प्रा. एन.एम. अहीरे हे उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जळगाव तालुका अध्यक्ष प्रमोद रुल्हे व जिल्हा सल्लागार विजय बोरसे यांनी केले आहे. तर यावेळी विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे.