नवापूर । महाराष्ट्र शासनाने 50 कोटी वृक्ष लागवडीचे उदिष्ट 3 वर्षात निश्चित केले असून सन 2017 च्या पावसाळ्यात 1 जुलै ते 7 जुलै 2017 या कालावधीत 4 कोटी वृक्ष लागवड करावयाची आहेत. यासाठी रोपे आपल्या दारी ही योजना राबविण्यात येत असून त्यासाठी वनक्षेञपाल नवापूर प्रादेशिक मार्फत नवापूर वनक्षेञ कार्यालय आवारात वन महोत्सव केद्राची स्थापना करण्यात आली आहे. दि 25 जुन ते 30 जुन 2017 या कालावधीत नवापूर शहरवासियांनी वन महोत्सव केद्रावर रोपांची मागणी, नोंदणी करावी व सवलतीच्या दरात शुल्क भरून रोपे ताब्यात घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.
वृक्षारोपण आणि संवर्धन : दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने रोपे आणुन वृक्षारोपण करण्याची हलचल सुरू झाली असून नागरिक सेवाभावी संस्था, वृक्षमिञ, वृक्षप्रेमी रोपांची मागणी करून नोंदणी करत आहे. नेहमीच येतो पावसाळा त्यामुळे नेहमीच येतो पावसाळा नेहमीच करावे वृक्षारोपण आणि संवर्धन अशी चांगली ट्रेड समाजात सुरू झाल्याने वंसुधरेला वाचविण्यासाठी हे पाऊल सकारात्मक व स्वागतार्ह व स्तुत्य उपक्रमील म्हटले जात आहे.
नेहमी उद्भवणारे प्रश्न : रोपे आपल्या दारी नक्की काय आहे-1) शहरी भागात वन विभागातर्फ रोपे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची योजना आहे 2) रोपे कोणाला मिळतील-शहरी भागातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, इतर संस्था, 3) नोंदणी कशी व कुठे करावी-दि 25 ते 30 जुन नवापूर केद्रावर नोंदणी करावी 4) रोपे पोच – वृक्षमित्र घरपोच रोपे देतील 6) रोपे कसे लावाल-रोपाची पिशवी सर्व बाजूंनी दाबुन पिशवी काढून घेणे, खड्ड्यात रोप मध्यभागी सरळ उभे करून माती आत ढकलून अलगद करावी, रोपाभोवती आळे करून त्यात पाणी टाकून रोप उंच असल्यास त्यास काडीचा आधार द्यावा.
अल्प दरात वृक्ष दारी
दि 1 जुलै ते 5 जुलै 2017 या कालावधीत नवापूर शहरवासियांनी वन महोत्सव केद्रावर रोपांची मागणी नोंदणी करावी. सवलतीच्या दराने शुल्क भरावे. मागणी केलेली रोपे वृक्ष मित्रामार्फत दुचाकी वाहनाने घरपोच केले जाणार आहेत. प्रति कुटुंब 5 रोपे व गृहनिर्माण आणि इतर संस्थाकरीता 25 रोपे उपलब्ध होतील तरी तात्काळ आपली मागणी वन महोत्सव केद्रावर करावी असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हडपे यांनी केले आहे.